नवी दिल्ली - रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी केंद्र सरकार विविध मार्गांचा अवलंब करत आहे. ड्रायव्हिंग परवान्यासाठी कमीत कमी आठवी पास बंधनकारक असताना ही अट वाहतूक मंत्रालय काढून टाकणार आहे. देशातील वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला २२ लाख वाहन चालकांची कमतरता आहे.
नियमात बदल करण्यासाठी वाहतूक मंत्रालय केंद्रीय मोटर कायदा १९८९ मधील नियम ८ मध्ये बदल करणार आहे. त्याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागात अनेकजण बेरोजगार आहेत. अनेकांनी शिक्षण घेतलेले नाही. मात्र, ते साक्षर आणि कुशल आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व कौशल्य असलेल्या व्यक्तींना नव्या नियमाचा फायदा होणार आहे. ही अट वगळण्याची विनंती हरियाणा सरकारने वाहतूक मंत्रालयाला केली होती.
वाहन परवान्यासाठी आता शिक्षणाची अट नाही; सरकार आठवी पासची अट काढून टाकणार - driving license
शिक्षणाची अट काढून घेतली तरी वाहन चालकांचे प्रशिक्षण आणि कौशल्याची चाचणी घेतली जाणार असल्याचे वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
संग्रहित - वाहन चालक
शिक्षणाची अट काढून घेतली तरी वाहन चालकांचे प्रशिक्षण आणि कौशल्याची चाचणी घेतली जाणार असल्याचे वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. रस्ते सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे यापुढे वाहन चालक परवान्यासाठी केवळ बंधनकारक असलेली चाचणी पास करावी लागणार आहे.