नवी दिल्ली - सरकारी कंपनी असलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भीम अॅपमध्ये खास सुविधा देणार आहे. यामधून वापरकर्त्यांना विविध बँक खाती एकाच अॅपमधून वापरता येणार आहेत. त्यासाठी भीम अॅपची सुधारित आवृत्ती ही ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात येणार आहे.
खासगी कंपन्यांना सरकारची 'भीम'टक्कर ; सर्व बँकांची खाती वापरता येणार एकाच अॅपवर
भीम अॅपचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना विविध बँक खाती एकाच अॅपमधून वापरणे शक्य होणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले.
भीम अॅपचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना विविध बँक खाती एकाच अॅपमधून वापरणे शक्य होणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. हे अॅप खासगी देयक माध्यमांशी (पेमेंट प्लॅटफॉर्म्स) तगडी स्पर्धा करेल, असा विश्वासही अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
सध्या भीम अॅपमधून देयकाच्या विविध सेवा देण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध व्यापाऱ्यांना आणखी सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे वापरकर्त्याला भीम अॅपचा वापर करून विविध उत्पादने आणि सेवांचा लाभ घेता येणार आहे. भीम अॅपचा वापर करून १.५ कोटी आर्थिक व्यवहार जूनमध्ये पार पडले. हे आर्थिक व्यवहार ६ हजार २०२ कोटी रुपयांचे होते.