नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे नवे धोरण सरकार लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिली. या धोरणात रणनीतीच्या क्षेत्रांची नव्याने व्याख्या करण्यात येणार आहे. त्यामध्ये चारहून अधिक सार्वजनिक कंपन्या नसणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
देशात केवळ चारच सार्वजनिक कंपन्या राहणार - सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे नवे धोरण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे महिन्यात आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजची घोषणा केली होती. यावेळी त्यांना रणनीतीच्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त चार सार्वजनिक कंपन्या असणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.
नव्या सार्वजनिक धोरणावर काम सुरू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, की ते धोरण केंद्रीय मंत्रिमंडळात जाणे आवश्यक आहे. किमान चार सार्वजनिक कंपन्या ठेवण्यासाठी विविध प्रारुप (मॉडेल) असू शकतात. सार्वजनिक कंपन्यांचे विलिनीकरण होवू शकते. देशाला आत्मनिर्भर करण्याच्यादृष्टीने केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. सर्वच क्षेत्र हे खासगी क्षेत्रासाठी खुली होणार आहेत. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. या बैठकीबाबत विचारले असता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आरबीआयने निर्णय घ्यायचा असल्याचे उत्तर दिले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे महिन्यात आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजची घोषणा केली होती. यावेळी त्यांना रणनीतीच्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त चार सार्वजनिक कंपन्या असणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. तर इतर सार्वजनिक कंपन्यांचा आपोआप खासगीकरणाच्या वर्गीकरणात समावेश होणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले होते.