महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारत बंदमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी होवू देवू नये; सरकारचे बँकांना आदेश - ८ जानेवारी देशव्यापी संप

जे कर्मचारी संपात सहभागी होतील त्यांना परिणामांना सामोरे जावे लागले, असे केंद्र सरकारने आदेशात म्हटले आहे. यामध्ये वेतन कपात आणि योग्य शिस्तभंगाची कारवाईचा समावेश असल्याचे आदेशात म्हटले आहे

File photo  -Strike
संग्रहित - संप

By

Published : Jan 7, 2020, 5:53 PM IST


नवी दिल्ली - कर्मचाऱ्यांना भारत बंदमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करावे, अशा सूचना केंद्र सरकारने सरकारी बँकांनी दिल्या आहेत. उद्या ८ जानेवारीला देशातील १० केंद्रीय व्यापारी संघटनांनी संप पुकारला आहे.

जे कर्मचारी संपात सहभागी होतील त्यांना परिणामांना सामोरे जावे लागले, असे केंद्र सरकारने आदेशात म्हटले आहे. यामध्ये वेतन कपात आणि योग्य शिस्तभंगाची कारवाईचा समावेश असल्याचे आदेशात म्हटले आहे. विभाग आणि मंत्रालयाच्या कामकाजासाठी पर्यायी नियोजन करण्यात येवू शकते, असेही आदेशात नमूद केले आहे. संपादिवशी कोणतीही सुट्टी मंजूर केली जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. संपादिवशी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही वेतन आणि भत्ते देण्यात येणार नसल्याचे वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-सरकारी बँकांची सेवा विस्कळित होण्याची शक्यता; उद्या कामगार संघटनांचा संप

केंद्रीय व्यापारी संघटनांनी कामगार सुधारणा, थेट विदेशी गुंतवणूक, निर्गुंतवणूक अशा विविध धोरणांचा निषेध करत संप पुकारला आहे. तर काम करणाऱ्या वर्गासाठी किमान वेतनासारख्या १२ सामाईक मागण्या केल्या आहेत.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ४२० रुपयांची घसरण, 'हे' आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details