महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सरकार रेलटेल कॉर्पोरेशनचा सप्टेंबरमध्ये आणणार आयपीओ, ३०० कोटींचे उद्दिष्ट - रेलटेल

रेलटेल ही मिनिरत्न असलेली सरकारी संस्था आहे. ही कंपनी ऑप्टिक फायबर नेटवर्कसाठी लागणारी पायाभूत सुविधा पुरविते.

प्रतिकात्मक - रेलटेल

By

Published : May 13, 2019, 7:32 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये रेलटेल कॉर्पोरेशनचा आयपीओ अथवा प्रारंभिक समभाग विक्री बाजारात आणणार आहे. यामधून ३०० कोटी मिळविण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.


गतवर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने रेलेटेल कॉर्पोरेशनचा आयपीओ बाजारात आणण्याला मंजुरी दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारने रेलेटेल कॉर्पोरेशनमधील २५ टक्के भागीदारी कमी केली आहे.

रेलटेल ही कंपनी काय करते काम?

रेलटेल ही मिनिरत्न असलेली सरकारी संस्था आहे. ही कंपनी ऑप्टिक फायबर नेटवर्कसाठी लागणारी पायाभूत सुविधा पुरविते. तसेच देशाला लागणाऱ्या ब्रॉडबँड आणि मल्टीमीडिया नेटवर्कची पायाभूत सुविधा संपूर्ण देशात देते.


रेलटेलच्या आयपीओसाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) लवकरच व्यापारी बँका आणि कायदेशीर सल्लागार नेमणार आहे. रेलटेल कॉर्पोरेशनला त्यांच्या अंतिम आर्थिक कामगिरीचे वित्तीय लेखापरीक्षण करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

आणखी दोन सरकारी कंपन्यांचे आयपीओ येणार बाजारात
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने रेल विकास निगम लि. (आरव्हीएनएल) कंपनीचा १२ टक्के हिस्सा विकून आयपीओमधून ४७६ कोटी रुपये जमविले आहेत. चालू आर्थिक वर्षात डीआयपीएएम ही इंडियन रेल्वे केटरिंग आणि टूरिझम कार्पोरेशनसह इंडियन रेल्वे फायान्स कॉर्पोरेशनचे आयपीओ बाजारात आणणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details