महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

रंगीत दूरसंचांच्या आयातीवर केंद्र सरकारकडून निर्बंध - रंगीत टीव्ही आयात निर्बंध

विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) अधिसूचना काढून रंगीत टीव्हीची मुक्त आयात रद्द करत निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी रंगीत दूरसंचाचा निर्बंध लागू केलेल्या वस्तूंच्या श्रेणीत समावेश केला आहे.

संग्रहित - रंगीत टीव्ही
संग्रहित - रंगीत टीव्ही

By

Published : Jul 31, 2020, 1:47 PM IST

नवी दिल्ली– केंद्र सरकारने रंगीत दुरसंचांच्या (टीव्ही) आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामागे देशातील उत्पादनाला चालना मिळावी, असा हेतू आहे. रंगीत टीव्हीच्या आयातीवर निर्बंध लागू केल्याने चीनसारख्या देशांमधून आयातीचे प्रमाण कमी होईल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.

विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) अधिसूचना काढून रंगीत टीव्हीची मुक्त आयात रद्द करत निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी रंगीत दूरसंचाचा निर्बंध लागू केलेल्या वस्तूंच्या श्रेणीत समावेश केला आहे. त्यामुळे रंगीत टीव्हीची आयात करण्यासाठी डीजीएफटीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

चीनसह व्हिएतनाममधून सर्वाधिक टीव्हीची आयात

भारतामध्ये चीन, व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलंड आणि जर्मनीमधून टीव्हीची आयात करण्यात येते. रंगीत टीव्ही 36 सेंटीमीटर ते 105 सेंटीमीटरचा असेल तर आयात करता येणार नाही, तर 63 सेंटीमीटरहून कमी आकाराच्या एलसीडी टीव्हीच्या आयातीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारताने वर्ष 2019-20 मध्ये 781 दशलक्ष डॉलरच्या रंगीत टीव्हीची आयात केली आहे. यामध्ये चीन आणि व्हिएतनाममधून 428 दशलक्ष टीव्हीची आयात केली आहे.

पॅनासॉनिक इंडियाचे सीईओ आणि अध्यक्ष मनीष शर्मा म्हणाले, की ग्राहक हे उच्च दर्जाच्या असेम्बल टीव्हीच्या खरेदीकडे वळत आहेत. रंगीत टीव्हीच्या आयातीवर निर्बंध लागू केल्याने देशातील टीव्ही असेम्बलिंगवर सकारात्मक परिणाम होणार आहे. आघाडीच्या ब्रँडने यापूर्वीच देशात टीव्हीचे उत्पादन आणि असेम्बलिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आमच्या ब्रँडवर परिणाम होणार नाही.

दरम्यान, केंद्र सरकारने देशातील उत्पादनांना चालना मिळण्यासाठी आत्मनिर्भर अभियान योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यामधून अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या आयातीवर निर्बंध आणण्यात येत आहे. विशेषत: पूर्व लडाखमध्ये सीमारेषेवर तणावाची स्थिती असताना चीनमधून आयात कमी करण्याचे सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details