महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सरकारने जाहीर केलेल्या सुधारणांनी वाहन उद्योगाला मदत होईल - उद्योजकांच्या प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चलनाची तरलता वाढविण्यासाठी पारदर्शकता, जीएसटीचा एमएसएमईचा लवकर परतावा, पायाभूत उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध करून देणे असे निर्णय जाहीर केले आहेत.

संग्रहित - वाहन उद्योग

By

Published : Aug 24, 2019, 1:03 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ३२ सुधारणांची शुक्रवारी घोषणा केली. या निर्णयाने वाहन उद्योगाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया विविध उद्योजकांनी दिल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चलनाची तरलता वाढविण्यासाठी पारदर्शकता, जीएसटीचा एमएसएमईचा लवकर परतावा व पायाभूत उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध करून देणे असे विविध निर्णय जाहीर केले आहेत.


एसआयएएमकडून सरकारच्या सुधारणांचे स्वागत-
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्च्युअरचे (एसआयएएम) अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले, पुढील जीएसटीच्या बैठकीत जीएसटीच्या कपातीची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.


केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यांनी दोन आठवडे उद्योगाबरोबर चर्चा करून चांगला प्रतिसाद दिला आहे. परवडणाऱ्या दरात आणि सुलभतेने किरकोळ वित्तीय पुरवठा तसेच डीलरला वित्तीय पुरवठा हा उद्योगासाठी चिंतेचा विषय होता. शुक्रवारी केलेल्या घोषणेने दोन्ही चिंता मिटल्या असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यांनी केंद्र सरकारच्या सुधारणांची अंमलबजावणी करावाी- मारुती सुझुकी इंडिया
संपूर्ण पॅकेज हे अर्थव्यवस्थेला फायदेशीर ठरेल, असा विश्वास मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर.सी.भार्गव यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांसाठी पुढाकार घेतला असताना राज्यांनी पुढाकार घ्यावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. वाहन उद्योगासाठी रस्ते कर कमी करावा व काही राज्यांनी वाढविलेले नोंदणी शुल्क कमी करावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. जर राज्यांनी केंद्र सरकारच्या सुधारणांची अंमलबजावणी केली तर आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर खूप सकारात्मक वातावरण तयार होणार आहे.


वाहनांची मागणी वाढेल - एफएडीए
ऑटोमाबाईल डीलर संघटना एफएडीएचे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे म्हणाले, सीतारामन यांनी जाहीर केलेल्या सुधारणांनी ग्राहकांचा विश्वास नक्कीच वाढणार आहे. येणाऱ्या सणाबाबत डीलर समुदाय खूप आशादायी आहे. वाहनांची मागणी वाढेल, त्यातून सकारात्मक परिस्थिती होईल, असेही काळे म्हणाले.

महिंद्रा अँड महिंद्राचे संचालक पवन गोयंका म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणाने परिस्थिती दीर्घकाळासाठी सुधारणार आहे. यामधून सरकार हे उद्योगांचे ऐकत असल्याचे दिसून आले आहे.

सरकारकडून खरेदी करण्यात येणाऱ्या नव्या वाहनांच्या खरेदीवर बंदी काढण्यात आली आहे. त्याचाही चांगला परिणाम होईल, असे वाहनांचे सुट्टे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांची संघटना एसीएमएचे अध्यक्ष राम वेंकटरमणी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details