नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे केंद्र सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे सरकार केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२ मध्ये शेतकऱ्यांचा वित्त पुरवठा वाढवून १९ लाख कोटी रुपये करणार असल्याचे सूत्राने सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
चालू आर्थिक वर्षात वित्त पुरवठा १५ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले होते. सरकारकडून दरवर्षी कृषी क्षेत्राला करण्यात येणाऱ्या वित्त पुरवठ्यात वाढ करते. यंदा वर्ष २०२१-२२ वर्षासाठी कृषी क्षेत्रासाठी वित्त पुरवठा हा १९ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल, असे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर ग्रीन कर; केंद्राचा प्रस्ताव