महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इराणकडे भारतीय चलनाचा कमी साठा; व्यापार पूर्ववत करण्याकरता भारताचे प्रयत्न सुरू - Iran need Indias Sugar

इराण आणि भारतामध्ये रुपयांमधून व्यवहार होतात. मात्र, इराणकडे रुपयाचे चलन हे युको आणि आयडीबीआयमध्ये कमी प्रमाणात आहे. त्याचा भारताबरोबरील कृषी उत्पादनांच्या व्यापारावर परिणाम झाला आहे.

India Iran trade news
भारत इराण व्यापार न्यूज

By

Published : Mar 24, 2021, 5:59 PM IST

नवी दिल्ली- भारतीय चलनाचा बँकांमध्ये कमी साठा असल्याने इराण-भारतामधील व्यापारावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या चलनांमधून व्यापार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामधून पुढील महिन्यात तोडगा निघेल, असा विश्वास केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

इराण आणि भारतामध्ये रुपयांमधून व्यवहार होतात. मात्र, इराणकडे रुपयाचे चलन हे युको आणि आयडीबीआयमध्ये कमी प्रमाणात आहे. त्याचा भारताबरोबरील कृषी उत्पादनांच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. यामध्ये साखर, चहापत्ती आणि तांदुळ यांचा उत्पादनांचा समावेश आहे. व्यापार केल्याने वेळेवर पैसे मिळतील की नाही, अशी चिंता असल्याने निर्यातदार इराणबरोबर व्यापार करण्यासाठी धजावत नाहीत.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा १४९ रुपयांची घसरण; चांदीचे दरही उतरले!

एप्रिलमध्ये पुन्हा इराणबरोबर व्यापार सुरू होईल-

केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव सुधांशु पांडे म्हणाले की, इराणबरोबर तडजोडीचे बोलणे सुरू आहे. हे तडजोडीची बोलणी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय करत आहे. यामधून मार्ग निघेल, अशी आम्हाला आशा आहे. त्यावर एप्रिलपर्यंत मार्ग निघेल, असा आम्ही प्रयत्न करत आहोत. इराणकडे इतर देशांचे चलन आहे. द्विपक्षीय व्यापारांमध्ये इतर देशांची चलन स्वीकरण्यासाठी भारत-इराणमध्ये चर्चा सुरू आहे. एप्रिलमध्ये भारतामधून इराणमध्ये साखरेची पुन्हा निर्यात सुरू होईल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला. इराणला भारताच्या साखरेची गरज आहे. कारण, भारतामधील साखरेची किंमत योग्य आणि वाहतुकीचा खर्चही कमी आहे.

हेही वाचा-टाळेबंदी घोषणेची वर्षपूर्ती : देशातील बेरोजगारीचे संकट कायमच

अमेरिकेने इराणवर नोव्हेंबर २०१८ मध्ये निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर भारत-इराणच्या व्यापारी संबंधावर परिणाम झाला आहे. गतवर्षी इराणने भारतामधून ११ लाख टन साखरेची आयात केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details