नवी दिल्ली- येत्या हंगामात पिकाची लागवड करताना अडचणी येवू नये, म्हणून लॉकडाऊनमधून शेतकऱ्यांना, शेतमजूर व शेती मशिनरी केंद्रांना वगळण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात दिलेली आहे.
लॉकडाऊनमधून खत उत्पादक आणि पॅकेजिंग युनिट, कीटकनाशक आणि बियाणे उत्पादनांना वगळण्यात आले आहे. भाजीमंडई व खत विक्री करणााऱ्या दुकानांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी एजन्सी काम करत आहेत. अशा स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लॉकडाऊनमधून वगळले आहे.
हेही वाचा-लॉक डाऊन : ई-कॉमर्स कंपन्यांचे अंशत: कामकाज सुरू, डिलिव्हरी मिळायला होणार उशीर