नवी दिल्ली- आगामी तिमाहीत अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर बदलण्यावर सरकार विचार करत असल्याचे सूत्राने सांगितले.
बँकांनी ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत. तरीही सरकारने सध्याच्या तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) अशा अल्पबचत योजनांवरील व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहे.
हेही वाचा-कोरोनाने विमाने जमिनीवर; 'गो एअर'कडून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द
अल्पबचत योजनांवरील व्याजदर जास्त असल्याने ठेवीवरील व्याजदर कमी करता येत नसल्याची बँकांची तक्रार आहे. ठेवीवरील व्याजदर आणि अल्पबचत योजनांवरील व्याजदर यामध्ये सुमारे १०० बेसिस पाँईंटचा फरक आहे. कोरोना विषाणूचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होत आहे. अशा स्थितीत रेपो दराबाबत पतधोरण समिती निर्णय घेईल, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच सांगितले आहे.
हेही वाचा- येस बँकेच्या ग्राहकांना दिलासा, सेवा पूर्वपदावर