महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारकडून कपात ; जाणून घ्या सुकन्या, समृद्धीसह पीपीएफवर मिळणारे व्याज - small savings schemes

अल्पबचत योजना आणि पीपीएफवरील व्याजदराचा दर तिमाहीदरम्यान आढावा घेण्यात येतो. ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान ३०-४० बेसिस पाँईटने वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून ते व्याजदर स्थिर राहिले होते.

प्रतिकात्मक - अल्पबचत गुंतवणूक

By

Published : Jun 29, 2019, 12:55 PM IST

नवी दिल्ली- तुम्ही पीपीएफ किंवा पोस्टातील मुदत ठेवीपासून व्याजदर मिळवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपातीचा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीदरम्यान १० बीपीएसने व्याजदर कमी करण्यात आले आहेत. याबाबतची सूचना केंद्रीय वित्तीय मंत्रालयाने काढली आहे.


गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीदरम्यान (जानेवारी-मार्च) सरकारने अल्पबचतीच्या योजनेवरील व्याजदरात कपात केली होती. तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एप्रिल-जूनच्या दरम्यान अल्पबचतीवरील योजनेच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि अल्पबचतीच्या योजनेवरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि पीपीएफवरील व्याजदर हे १० बेसिस पाँईटने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी कमी करण्यात आले आहेत.

चालू वर्षाच्या प्रारंभापासून आरबीआयने रेपोदरात ७५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी मुदत ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजात कपात केली आहे. अल्पबचत योजना आणि पीपीएफवरील व्याजदराचा दर तिमाहीदरम्यान आढावा घेण्यात येतो. ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान ३०-४० बेसिस पाँईटने वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून ते व्याजदर स्थिर राहिले होते.

असे असतील नवे व्याजदर

योजना पूर्वीचे व्याजदर नवा व्याजदर
सुकन्या समृद्धी ८.५% ८.४ %
पीपीएफ ८% ७.९%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ८% ७.९%
किसान विकास पत्र (केव्हीपी) ११२ महिन्यांवर ७.७ टक्के ११३ महिन्यांवर ७.६ टक्के


पोस्ट कार्यालयाच्या खात्यावर १ ते ३ वर्षाच्या मुदत ठेवीवर तीन महिन्यांच्या कालावधीकरता ६.९ टक्के व्याज असणार आहे. तर रिअकरिंगसाठी ७.३ टक्क्याऐवजी ७.२ टक्के असणार आहे. पाच वर्षांच्या कालवाधीकरिता मुदत ठेवीवर ७.७ टक्के व्याज असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेवर ८.७ टक्क्यांऐजी ८.६ टक्के व्याजदर असणार आहे. पोस्टातील वार्षिक बचत ठेवीवरील ४ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.

एप्रिल २०१६ पासून केंद्र सरकार दर तिमाहीला बाजार दराप्रमाणे अल्पबचतीवरील व्याजदर निश्चित करते. गेल्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीदरम्यान ३०-४० बीपीएस दराने अल्पबचतीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details