महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 13, 2019, 1:44 PM IST

ETV Bharat / business

केंद्र सरकार आणखी १२ हजार टन कांदा करणार आयात

सलग दुसऱ्या आठवड्यात कांद्याचे दर किरकोळ बाजारपेठेत प्रति किलो १०० रुपयांहून अधिक आहेत. या किमती आटोक्यात राहण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.  केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एमएमटीसी या सरकारी संस्थेला कांदे आयात करण्याचे आदेश दिले आहेत.

onion Market
संग्रहित - कांदा बाजारपेठ

नवी दिल्ली - कांद्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. अशा स्थितीत कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आणखी १२ हजार ६६० टन कांदा आयात करणार आहे. हा कांदा देशात २७ डिसेंबरला पोहोचणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सलग दुसऱ्या आठवड्यात कांद्याचे दर किरकोळ बाजारपेठेत प्रति किलो १०० रुपयांहून अधिक आहेत. या किमती आटोक्यात राहण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एमएमटीसी या सरकारी संस्थेला कांदे आयात करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार एमएमटीसीला १५ हजार टन कांदा आयात करावा लागणार आहे. एमएमटीसी प्रत्येकी ५ हजार टन आयातीचे तीन कंत्राटे देणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ३० हजार टन कांदा आयातीचे कंत्राट दिले होते.

हेही वाचा-मुंबईत चक्क कांद्याची चोरी.. दोन दुकाने फोडून 21 हजारांचा कांदा लांबवला

उशिरा आलेला मान्सून आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील कांद्याचे पीक वाया गेले. त्यामुळे कांद्याचे दर २६ टक्क्यांनी वाढल्याचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी नोव्हेंबरमध्ये म्हटले आहेत. कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी सरकारकडून शक्य ती सर्व पावले उचलली जात असल्याचेही पासवान यांनी म्हटले होते. कांदे निर्यातीवर बंदी आणि १.२ लाख टन कांदे आयातीला परवानगी असे निर्णय यापूर्वी केंद्र सरकारने घेतले आहेत.

हेही वाचा-नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला

राज्य सरकारने कांदे साठेबाजीवर कारवाई करावी, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने निर्देश दिले आहेत. किरकोळ विक्रेत्यांना ५ टनांऐवजी जास्तीत जास्त २ टन कांदा साठवता येणार आहे. घाऊक विक्रेत्यांना जास्तीत जास्त ५० टनांऐवजी २५ टन कांदा साठवणुकीची मर्यादा घालून दिलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details