महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गुगल अखेर नमले! अॅप डेव्हलपरच्या शुल्कात कपात - fee for app developers by google

गुगलकडून अॅपच्या खरेदीवर १५ टक्के शुल्क घेण्यात येणार आहे. हे शुल्क अॅपमधून १ दशलक्षपर्यंत वार्षिक उलाढाल होत असल्यास लागू होणार आहे.

Google play store
गुगल प्ले स्टोअर

By

Published : Mar 17, 2021, 4:27 PM IST

सेऊल- गुगल अखेर जगभरातील डेव्हलपरच्या दबावापुढे झुकले आहे. गुगलने डेव्हलपरसाठी अॅप स्टोअरवर नोंदणीकरता लागणाऱ्या शुल्कात कपात केली आहे.

गुगलकडून अॅपच्या खरेदीवर १५ टक्के शुल्क घेण्यात येणार आहे. हे शुल्क अॅपमधून १ दशलक्षपर्यंत वार्षिक उलाढाल होत असल्यास लागू होणार आहे. तर वार्षिक १ दशलक्ष डॉलरची उलाढाल असलेल्या अॅपच्या डेव्हलपरला ३० टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. गुगलचे डेव्हलपरसाठी नवे धोरण हे १ जुलैपासून लागू होणार आहे.

हेही वाचा-आरबीआयने स्टेट बँकेला ठोठावला २ कोटींचा दंड

कंपनीच्या माहितीनुसार ९९ टक्के डेव्हलपरचा व्यवसाय हा वार्षिक १ दशलक्ष डॉलरहून कमी आहे. गुगलने यापूर्वी अॅपच्या डेव्हलपरसाठी ३० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय दक्षिण कोरियामध्ये घेतला होता. तसेच अॅपच्या व्यवहारासाठी गुगल पेचा वापर करणे हे जानेवारी २०२१ पासून बंधनकारक केले होते. विविध कंपन्यांसह राजकीय नेत्यांनी टीका केल्यामुळे गुगलने बिलिंगचे धोरण सप्टेंबरपर्यंत ढकलण्याचा निर्णय घेतला होता. गुगलने प्लॅटफॉर्ममध्ये पुनर्गुंतवणूक करण्यासाठी सेवा शुल्क महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा-हिरोच्या ५० हजार इलेक्ट्रिक वाहनांची वर्षभरात विक्री

गुगलने म्हटले आहे, आम्ही दक्षिण कोरियन डेव्हलपरसाठी उत्कृष्ट असे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.

दरम्यान, टाळेबंदीमुळे लहान मुलांसह सर्वांनाच घरात थांबावे लागत होते. अशा काळात लहान मुलांना घरी बसून शिकण्यासाठी गुगलने प्ले स्टोअरवर 'किड्स' हा नवा विभाग सुरू करणार आहे. यामध्ये शिक्षकांनी निवडलेले अॅप दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details