महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गुगल अॅपने आणले हे फीचर; दिव्यांगांना होणार फायदा - new features for android users

दिव्यांगांना गुगल अस्टिस्टंटमधून कॉल करणे, संदेश पाठविणे, व्हिडिओ चालू करता येणार आहेत. त्यासाठी अॅक्शन ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. हे अॅक्शन ब्लॉक प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.

संग्रहित - गुगल
संग्रहित - गुगल

By

Published : May 24, 2020, 12:38 PM IST

सॅनफ्रान्सिस्को - गुगलने अँड्राईड आणि अॅपमध्ये खास वैशिष्ट्ये आणली आहेत. कर्णबधीर, मूकबधीर आणि आकलनक्षमता कमी असलेल्यांना हे अॅप वापरता येणार आहेत. तसेच दिव्यांगांना हवे तसे होम स्क्रीनवर बटन ठेवता येणार आहेत.

दिव्यांगांना गुगल अस्टिस्टंटमधून कॉल करणे, संदेश पाठविणे, व्हिडिओ चालू करता येणार आहेत. त्यासाठी अॅक्शन ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. हे अॅक्शन ब्लॉक प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. ते अँड्राईड ५.० आणि त्याहून अधिक अँड्राईड व्हर्जनवर चालू शकतात.

हेही वाचा-विषमतेचे चित्र : अमेरिकेत लाखो बेरोजगार; अब्जाधीशांच्या संपत्तीत ४३४ अब्ज डॉलरची वाढ

गुगलने ट्रान्स्क्राईबने संभाषणाचे शब्दात रुपांतरण करणारे रिअल टाईम काम करणारे अॅप विकसित केले आहे. हे अॅप दिव्यांगासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. जर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे असेल तर कुणी व्यक्ती वापरकर्त्याच्या संपर्कात आला तर स्मार्टफोन कंपन पावणार आहे. तसेच वापरकर्त्यांच्या नावाने कुणी हाक मारली तरीही स्मार्टफोन कंपन पावणार आहे. हे लाईव्ह ट्रान्सक्राईब हे पंजाबीसह ७० भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-सावधान! सायबर हल्ल्याच्या प्रमाणात तीन महिन्यातच 37 टक्क्यांची वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details