वॉशिंग्टन-अमेरिकेमधील एच-१बी व्हिसाधारकाच्या पत्नीला काम करण्याची मंजुरी मिळण्यासाठी गुगलकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. भारतामधील आयटी व्यावसायिकांकडून एच-१बी व्हिसा मिळविण्याचे सर्वाधिक प्रयत्न होतात.
अमेरिकेमधील एच-१बी व्हिसाधारकाच्या पत्नीला काम करण्याची मंजुरी मिळण्याची ३० कंपन्यांची मागणी आहे. या मागणीला गुगलनेही पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतरण सेवेकडून एच-१बी व्हिसाधारकांच्या पत्नी आणि २१ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना एच-४ व्हिसा दिला जातो.
हेही वाचा-जीएसटी परिषदेची २९ मे रोजी होणार ऑनलाईन बैठक
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटमध्ये म्हटले, आमच्या देशाच्या स्थलांतरितांना मदत करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आम्ही एच-४ प्रोग्राममध्ये ३० कंपन्यासह सहभागी झालो आहेत. त्यामुळे नवसंशोधन, रोजगारात आणि संधीत वाढ आणि कुटुंबांना मदत होईल.