महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गुगलची 'ही' सेवा ऑक्टोबरपासून होणार बंद

गुगल प्ले म्युझिकमध्ये लायब्ररीमध्ये वैयक्तिक 50 हजार ट्रॅक सुरक्षित ठेवता येत होते. युट्युबमध्ये त्याहून दुप्पट म्हणजे 1 लाख ट्रॅक सुरक्षित ठेवता येणे शक्य आहे. गुगल प्ले म्युझिकचे आणि युट्युब म्युझिकचे दर सारखेच आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Aug 21, 2020, 6:36 PM IST

नवी दिल्ली – गुगलचे प्ले म्यूझिक हे अॅप येत्या ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. त्याबाबतचे ई-मेल कंपनीने वापरकर्त्यांना पाठविले आहेत. वापरकर्त्यांनी गीत व संगीताचा संग्रह युट्यूबमध्ये सुरक्षित करावा, असे वापरकर्त्यांना सूचविले आहे.

वापरकर्त्यांना गुगल प्ले म्युझिकमधून संगीत, गाणे ऐकणे व विकत घेण्याचा पर्याय होता. वापरकर्त्यांना विकत घेतलेले गाणे वं संगीताच्या फाईली ऑनलाईन सुरक्षित ठेवण्याचीही सुविधा होती. मात्र, गुगल प्ले म्युझिक बंद होणार असल्याने ही सुविधाही बंद होणार आहे. वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित राहण्यासाठी गुगलने प्ले म्युझिकवरील सर्व फाईल यु ट्यु म्युझिकवर हलविण्याचा पर्याय केवळ एका क्लिकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.

युट्युब म्युझिकमध्ये 50 दशलक्ष ट्रॅक्स, अल्बमस आणि उच्च दर्जा व्हिडिओ, लाईव्ह कार्यक्रम आणि रिमिक्स आहेत. गुगल प्ले म्युझिकमध्ये लायब्ररीमध्ये वैयक्तिक 50 हजार ट्रॅक सुरक्षित ठेवता येत होते. युट्युबमध्ये त्याहून दुप्पट म्हणजे 1 लाख ट्रॅक सुरक्षित ठेवता येणे शक्य आहे. गुगल प्ले म्युझिकचे आणि युट्युब म्युझिकचे दर सारखेच आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details