नवी दिल्ली -अनेकदा गुगल मॅपने दाखविलेल्या चुकीच्या दिशांमुळे वापरकर्त्यांचा गोंधळ उडतो. त्यावर गुगलने चांगली शक्कल लढविली आहे.गुगलने ८० हून अधिक देशांमध्ये मॅपचे संपादन (इडिट) करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना काही विसरलेले रस्ते, ठिकाणे यांच्या नावातील बदल अथवा चुकीची माहिती काढणे शक्य होणार आहे.
जेव्हा तुम्हाला गुगल मॅपमध्ये एखाद्या रस्त्याचा समावेश नसल्याचे दिसते, तेव्हा मेन्यू बटनावर क्लिक करा. इडिट द अॅपला निवडा. त्यामध्ये मिसिंग रोडला निवडा. मॅपची ताकद तुमच्या हातात आहे, असे गुगल मॅपचे संचालक केव्हिन रीस यांनी सांगितले. केव्हिन रीस पुढे म्हणाले की, केवळ रेषा ओढून नवे रस्ते जोडता येतात. नवीन रस्त्यांची नावे बदलण्यात येतात. रस्त्यांची दिशा बदलता येते. चुकीची माहिती काढता येते. कोणत्या दिवशी व कोणत्या दिशेने रस्ता बंद झाला आहे, याची माहितीही तुम्हाला देणे शक्य होणार आहे. ही माहिती अचूकपणे अद्ययावत होण्यासाठी आम्ही पडताळणी करणार आहोत, असी रिसी यांनी सांगितले.