मुंबई - गुडविन ज्वेलर्सने चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिल्याने अनेक ग्राहकांनी कोट्यवधींची गुंतणूक केली. मात्र ज्वेलरीच्या दुकानाला अचानक दिवाळीत टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूक करणारे लाखो ग्राहक चिंतेत आहेत.
दिवाळाच्या तोंडावर गेली ३ दिवस ठाणे जिल्ह्यातील गुडविन ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. शेवटी आज दुकानावर 'क्लोज फॉर स्टॉके टेक'ची नोटीस लावण्यात आली. याची माहिती मिळताच ग्राहकांनी गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.
ठाण्यात गडकरी रंगायतन येथे असणारे गुडविन ज्वेलर्सचे दुकान बंद आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली एवढेच नाही तर देशभरातील सर्वच गुडविन ज्वेलर्सच्या दुकानांना टाळे लागल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याची भीती ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
बंद असलेले गुडविन ज्वेलर्सचे दुकान हेही वाचा-महागाईसह स्वस्ताईमधील चिनी पणत्यांनी कुंभारांच्या व्यवसायात 'अंधार'
सोने विक्री, कोट्यवधी रुपयांची भिशी, मासिक हप्त्यावर सोने व हिऱ्यातील गुंतवणूक अशा विविध व्यवहारांमुळे लाखो ग्राहक गुडविन ज्वेलर्सशी जोडले गेले होते. पण या दुकानाला टाळे लागल्याने ग्राहक धास्तावले आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गुडविन ज्वेलर्सशी संपर्क होऊ शकला नाही.