चेन्नई- सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर चुकवेगिरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन प्रकरणांमध्ये विमानतळावर ८.४५ किलो जप्त केले आहे. या सोन्याची किंमत ४.५० कोटी रुपये आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
दुबईहून येणाऱ्या १७ प्रवासी सोने तस्करी करत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधाराने संशयित प्रवाशांची सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी त्यांना पँटच्या पॉकेटसह इतरत्र लपविलेले सोने आढळले.