नवी दिल्ली – जागतिक अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेची टांगती तलवार असताना सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा 1,182 रुपयांनी वाढून 54 हजार 856 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
सोने-चांदीच्या किमतीला झळाळी; 'हे' आहेत आजचे दर - सोने भाव वाढ न्यूज
सोन्याचे दर जागतिक बाजारात मंगळवारी 2 हजार डॉलरहून अधिक राहिला आहे. त्यामुळे किमती वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 674 रुपये होता. मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो 1 हजार 587 रुपयांनी वधारून 72 हजार 547 रुपये झाला आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 70 हजार 960 रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस हा 2 हजार 5 डॉलरने वधारला आहे. तर चांदीचा दर प्रति औंस हा 28.15 डॉलरने वधारला आहे. सोन्याचे दर जागतिक बाजारात मंगळवारी 2 हजार डॉलरहून अधिक राहिला आहे. त्यामुळे किमती वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.