नवी दिल्ली- कोरोनाचे संकट असताना देशातील विदेशी गुंतवणुकीबाबत दिलासादायक बातमी आहे. वोन वेल्क्स या पादत्राण कंपनीचे प्रमुख कॅसा एव्हरझ गम्ब यांनी चीनमधून उत्पादन प्रकल्प भारतात हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
वोन वेल्क्सचे उत्पादन हे उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये घेतले जाणार आहे. त्यासाठी कंपनी लॅट्रीक इंडस्ट्रीजबरोबर भागीदारी करणार आहे. वोन वेल्क्स ही आरोग्यदायी पात्रदाणांमधील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीची पादत्राणे पायांचे तळवे, गुडघे आणि पाठीचे दुखणे तसेच सांध्यांचे संरक्षण यासाठी लाभदायी आहेत.
हेही वाचा-चीनमधून भारतात येणाऱ्या अॅपलला डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दिला इशारा