महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मौल्यवान रत्नांसह दागिन्यांच्या निर्यातीत जानेवारीमध्ये ७.८ टक्क्यांची घसरण - GJEPC on gold export

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ मध्ये मौल्यवान दागिने व रत्नांच्या निर्यातीत ३७ टक्क्यांची घसरण झाली आहे. कटिंग आणि पॉलिशिंग केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीत एप्रिल ते जानेवारीत २३.४३ टक्क्यांची घसरण झाली आहे.

सोने दरवाढ न्यूज
सोने दरवाढ न्यूज

By

Published : Feb 11, 2021, 10:55 PM IST

नवी दिल्ली- मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत जानेवारीत ७.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. जानेवारीत मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांची एकूण २.७ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. गतवर्षी जानेवारीत २.९ अब्ज डॉलरची निर्यात झाल्याची माहिती जेम्स ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल (जीजेईपीसी) दिली आहे.

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ मध्ये मौल्यवान दागिने व रत्नांच्या निर्यातीत ३७ टक्क्यांची घसरण झाली आहे. कटिंग आणि पॉलिशिंग केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीत एप्रिल ते जानेवारीत २३.४३ टक्क्यांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत ६५ टक्के घसरण झाली आहे. असे असले तरी सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत गेल्या १० महिन्यात ५.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा-स्मार्टफोनवर वेळ घालविण्यात भारतीय लोक जगात प्रथम

सुवर्णरोखे योजनेचा ग्राहकांना, रिटेल आणि बँकांना फायदा होणार असल्याचे जीजेईपीसीचे अध्यक्ष कोलीन शाह यांनी सांगितले. सुवर्णरोखे योजनेमुळे सोन्याच्या आयातीचे प्रमाण कमी होणार आहे. तर चालू खात्यातील वित्तीय तुटीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचेही शाह यांनी सांगितले.

हेही वाचा-केंद्र सरकारचे ट्विटरबरोबर उडाले खटके; 'कू'ला मिळाला फायदा

ABOUT THE AUTHOR

...view details