महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करा'

कामगारांचे प्रश्न हे राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयाने सोडविण्याची गरज आहे, असे गंगावार यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगावार
केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगावार

By

Published : Apr 18, 2020, 1:32 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगावार यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. या नोडल अधिकाऱ्यांनी कामगारांचे प्रश्न सोडिवण्यासाठी स्थापन केलेल्या २० नियंत्रण कक्षांशी समन्वय साधावा, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने टाळेबंदीदरम्यान अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी २० नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. कामगारांचे प्रश्न हे राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयाने सोडविण्याची गरज आहे, असे गंगावार यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा-टीव्हीएस मोटर कंपनीने इंग्लंडमधील 'या' दुचाकी कंपनीची घेतली मालकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदी ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. टाळेबंदीदरम्यान अनेक कामगार विविध शहरांमध्ये अडकले आहेत.

हेही वाचा-भारत उत्पादनाचे जागतिक हब होण्याकरता उर्जा मंत्रालयाने 'हा' घेतला निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details