महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्मार्टफोनचे नवे युग: दुमडू शकणारा 'सॅमसंग फोल्ड' भारतातही; ही आहेत वैशिष्ट्ये - Samsung smartphone

सॅमसंगचे अध्यक्ष एच. सी हाँग यांनी म्हणाले,  जे काही शक्य आहे, ते आम्ही गॅलेक्सी फोल्डमधून दाखविले आहे. मोबाईलच्या श्रेणीची नवी व्याख्या केली आहे. यासारखे कोणतेच उत्पादन नाही. स्मार्टफोनच्या रचनेत संपूर्णपणे नवा पायंडा निर्माण केला आहे.

सॅमसंग फोल्ड

By

Published : Oct 1, 2019, 6:02 PM IST

नवी दिल्ली- तुम्ही दुमडणारे स्मार्टफोन कधी पाहिले आहेत का? स्मार्टफोनच्या संरचनेत (डिझाईन) आमुलाग्र बदल घडवित असलेले दुमडणारे स्मार्टफोन लवकरच भारतामध्ये उपलब्ध होणार आहेत. अशा प्रकारचे स्मार्टफोन हे सॅमसंग कंपनी 'गॅलेक्सी फोल्ड' नावाने भारतामध्ये उपलब्ध करणार आहे. या मॉडेलची भारतात १ लाख ६४ हजार ९९९ रुपये किंमत असणार आहे.

गॅलक्सी फोल्डची इंटरनल स्टोअरेज (अंतगर्त स्मृतिक्षमता) ५१२ जीबी आहे. तर स्मार्टफोन वेगाने काम करण्यासाठी १२ जीबी रॅम देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनची ग्राहकांना ४ ऑक्टोबरपासून नोंदणीसाठी करता येणार आहे. तर वितरण २० ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. तसेच सॅमसंगच्या अधिकृत व किरकोळ दुकानात उपलब्ध असणार आहे. बंगळुरुमधील आयकॉनिक सॅमसंग ओपेरा हाऊसमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा-मारुतीच्या वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये २४ टक्के घसरण

सॅमसंगचे अध्यक्ष एच. सी हाँग यांनी म्हणाले, जे काही शक्य आहे, ते आम्ही गॅलेक्सी फोल्डमधून दाखविले आहे. मोबाईलच्या श्रेणीची नवी व्याख्या केली आहे. यासारखे कोणतेच उत्पादन नाही. स्मार्टफोनच्या रचनेत संपूर्णपणे नवा पायंडा निर्माण केला आहे. ग्राहकांना नवा अनुभव देण्यासाठी आम्ही नव्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, असे म्हटले आहे.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर मात्र पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच


ही आहेत स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

  • स्मार्टफोनला नेहमीच्या वापरासाठी ४.६ इंचचा स्क्रीन आहे. मात्र स्मार्टफोन दुमडल्यानंतर ७.३ इंचचा मोठा स्क्रीन होतो. त्यासाठी प्लास्टिक ओएलईडीचा वापर केल्याने पुस्तकासारखा स्मार्टफोन दुमडणे शक्य आहे.
  • स्मार्टफोनसाठी स्वतंत्र २४x७ हेल्पालाईन आहे. तर इन्फिटी फ्लेक डिसप्लेला कंपनीकडून एक वर्ष संरक्षण देण्यात आलेले आहे.
  • गॅलेक्सी बड्स हे ऐकण्यासाठी वापण्यात येणारे साधन उष्णतारोधक अ‌ॅरमिड फायबरपासून तयार करण्यात आले आहे.
  • हा जगातील पहिला डायनॅमिक एमएओएलईडी इन्फिटी फ्लेक डिस्पले असलेला स्मार्टफोन आहे. यामध्ये सहा कॅमेरा, अँड्राईड ९ आणि स्नॅपड्रॅगन ८५५ चा चिपसेट आहे.
  • सेल्फीची आवड असलेल्या तरुणांसाठी तीन सेल्फी कॅमेरे आहेत. यामधील १० मेगा पिक्सेलचा कॅमेरा स्मार्टफोन बंद केल्यानंतर वापरता येतो. तर दोन सेल्फी कॅमेरा मोबाईल सुरू असताना वापरता येतात. यामधील एक सेल्फी कॅमेरा १० मेगा पिक्सेलचा तर दुसरा ८ मेगापिक्सेलचा आहे.
  • याशिवाय १६ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईट कॅमेरा, १२ मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा आहे. तर १२ मेगा पिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे.
  • सॅमसंगने नेहमीच्या स्मार्टफोनहून ५० टक्के डिसप्ले पातळ करण्यासाठी नवीन पॉलिमरच्या थराचा शोध लावला आहे. याचा पॉलिमरचा गॅलेक्सी फोल्डमध्ये वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा-'यंत्रणेतील लोकांनी टीका सहन करायला पाहिजे'

मोबाईलमध्ये ४३८० एमएच क्षमता असलेल्या दोन बॅटरीची व्यवस्था आहे. ही बॅटरी स्वत:हून चार्ज होते. वायरलेस म्हणजे मोबाईलला चार्जर न लावताही स्मार्टफोन चार्जिंग करता येतो.
अ‌ॅप चांगल्या पद्धतीने चालावीत यासाठी सॅमसंगने गुगल आणि अँड्राईड विकसक समुदायाबरोबर (डेव्हलपर कम्युनिटी) काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details