ओसाका- जपानमधील जी २० परिषदेने जागतिक अर्थव्यवस्था मंदावत असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी जी २० समूह देशांच्या नेत्यांनी मुक्त आणि स्थिर अशा व्यापारी वातावरणाची गरज व्यक्त केली. तसेच जागतिक व्यापारी संघटनेच्या पुनर्रचनेचीही आवश्यकताही व्यक्त केली.
जागतिक अर्थव्यवस्था मंदावत असल्याचा जी २० परिषदेचा इशारा; मुक्त व्यापारासाठी वातावरण निर्मितीची गरज - FATF
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये (एफएटीएफ) नुकताच करण्यात आलेल्या सुधारणांचा वापर अँटी मनी लाँड्रिग आणि दहशतवादाविरोधात करण्यासाठी सर्व देशांनी सहमती दर्शविली आहे.
भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यासाठी जी २० समूह हा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास परिषदेतून व्यक्त करण्यात आला. भ्रष्टाचारी व्यक्तींसाठी सुरक्षित नंदनवन (safe heaven) होवू देवू नये आणि त्यासाठी एकमेकांत सहकार्य करण्याबाबत जी २० देशांचे एकमत झाले. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये (एफएटीएफ) नुकताच करण्यात आलेल्या सुधारणांचा वापर अँटी मनी लाँड्रिग आणि दहशतवादाविरोधात करण्यासाठी सर्व देशांनी सहमती दर्शविली आहे.
समूह देशांमध्ये विश्वास वाढविण्यासाठी 'संवाद आणि कृती' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक कृती कार्यक्रम २०२०-२०२१ ची अंमलबजावणी कऱण्यासाठी जी २० देशांनी बांधिलकी व्यक्त केली. यावेळी जागतिक बँक, जागतिक व्यापारी संघटना तसेच इतर जागतिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.