नवी दिल्ली -अन्न नियमन एफएसएसएआयने हवाबंद पाणी बॉटलवर माहिती देण्यासाठी कंपन्यांना १ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कंपन्यांना पाणी बॉटलवर कॅल्शियम आणि मॅग्निशियमची माहिती देण्यासाठी अवधी मिळणार आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणेने हवाबंद पाणी बॉटलवर माहिती देण्यासाठी यापूर्वी १ जानेवारी २०२०१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. कोरोनाच्या काळात फुड बिझनेस ऑपरेटर्सची तयारी झाली नाही. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ करण्याची विनंती केल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे. त्यामुळे कंपन्यांना पिण्याच्या बॉटलवर कॅल्शियम आणि मॅग्निशयमची माहिती देण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.
हेही वाचा-रिलायन्स इंडस्ट्रीजसह मुकेश अंबानी यांना सेबीकडून ४० कोटींचा दंड