नवी दिल्ली- फ्रान्सची कंपनी अमुंडीने अदानी कोळसा खाणीवरून स्टेट बँक ऑफ इंडियाला गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा दिला आहे. स्टेट बँकेने अदानी कोळसा प्रकल्पाला ५ हजार कोटींचे कर्ज देवू, नये, असे अमुंडी कंपनीने स्पष्ट म्हटले आहे.
डायरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूशनल कॉर्पोरेट क्लाईंट डिव्हीज आणि ईएसजीचे जीन जेकस बार्बरीस म्हणाले, की स्टेट बँकेने अदानी कोळसा प्रकल्पाला कर्ज देवू नये, असे वाटते. जर त्यांनी कर्ज दिले तर आम्ही तत्काळ गुंतवणूक काढून घेवू, असा त्यांनी इशारा दिला आहे. पुढे ते म्हणाले, की कोळसा खाणींना कर्ज देणे हे पूर्णपणे विसंगत आहे. कारण एसबीआयमधील ग्रीन बाँडमध्ये गुंतणूक झाली आहे. स्टेट बँकेला कर्ज देण्यात सहभागी होऊ नये, असे त्यांना कळविले आहे. सध्या, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहणार आहोत.