नवी दिल्ली - फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंडने सहा कर्ज योजना बंद करण्याचे जाहीर केल्या आहेत. ही बाब गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड उद्योग आणि वित्तीय बाजारपेठसाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सांगिलते. ही समस्या सोडविण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली.
देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या संकटामुळे एखाद्या म्युच्युअल फंडने कर्ज योजना बंद केली आहे. अशीच समस्या ऑक्टोबर २००८ मध्ये पहिल्या आठवड्यात निर्माण झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने आरबीआय, सेबी, इंडियन बँक्स असोसिएशन, अॅम्फीशी तत्काळ चर्चा केली होती, असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दुर्दैवाने बाजार शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहे. सरकारने त्वरित समस्या सोडवावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.