महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्रीय अर्थमंत्री खासगी बँकेसह गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांची आज घेणार बैठक - केंद्रीय अर्थमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बैठकीला एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच संग्रहित - निर्मला सीतारामन गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत.

संग्रहित - निर्मला सीतारामन

By

Published : Sep 26, 2019, 3:01 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या खासगी बँक, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक घेणार आहेत. वित्तपुरवठा आणि कर्जाच्या व्याजदरातील कपात आदी विषयाबाबत सीतारामन या बँकांशी चर्चा करणार असल्याचे सूत्राने सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बैठकीला एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच काही गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा-शेअर बाजाराचा निर्देशांक ४०० अंशाने वधारला; बँकिंगचे शेअर वधारल्याचा परिणाम


ही आहे सरकारची वित्तपुरवठ्याबाबत भूमिका-
सणादरम्यान ग्राहकांना अधिक कर्जपुरवठा व्हावा, अशी सरकारची इच्छा असल्याचे सीतारामन यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला म्हटले होते. निर्मला सीताराम यांनी सरकारी बँकांच्या बैठकीनंतर बँकाच्या वित्तपुरवठ्याविषयी मत व्यक्त केले होते. बँकांकडे पुरेसा वित्तपुरवठा आहे. मात्र हा वित्तपुरवठा बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रासह ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याची समजूत असल्याचे सीतारामन यांनी म्हटले होते.

हेही वाचा-भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक - पंतप्रधान मोदी

निर्मला सीतारामन यांच्याकडे कंपनी व्यवहार मंत्रालयाचाही पदभार आहे. बिगर बँकिग वित्तीय कंपन्यांसाठी विशेष खिडकी सुरू करण्यासाठी सीतारामन यांचे प्रयत्न आहेत. आरबीआयने कमी केलेल्या एकूण ११० बेसिस पाँईटचा व्याजदराचा लाभ सरकारी बँकांना द्यावा, असेही सीतारामन यांनी म्हटले होते. बँका १ ऑक्टोबरपासून व्याजदर हा रेपो दराशी संलग्न करणार आहेत.

हेही वाचा-एमएमआरडीएला राज्यातील पायाभूत क्षेत्रात १ लाख कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details