नवी दिल्ली - वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाबरोबर (एनएसडीसी) भागीदारी केली आहे. या करारामधून देशात २० हजार जणांना लॉजिस्टिक्समध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
फ्लिपकार्टची राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळासोबत भागीदारी, २० हजार जणांना देणार प्रशिक्षण - राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ
लॉजिस्टिक्स क्षेत्र कौशल्य परिषद (एलएससी) हा एनएसडीसीचा विभाग आहे. फ्लिपकार्ट ही एलएससीमधून मनुष्यबळाला प्रशिक्षित करणार आहे.
लॉजिस्टिक्स क्षेत्र कौशल्य परिषद (एलएससी) हा एनएसडीसीचा विभाग आहे. फ्लिपकार्ट ही एलएससीमधून मनुष्यबळाला प्रशिक्षित करणार आहे. यामध्ये आठ तासाचे मालाची डिलिव्हरी करण्याचे प्रशिक्षण असणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यापूर्वी मे महिन्यापासून एलएससीमध्ये ४ हजारहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या, फ्लिपकार्टमधून १० लाख मालाची रोज डिलिव्हरी दिली जाते. एलएससीचे सीईओ टी.एस.रामानुजम म्हणाले, कौशल्य विकास हा केंद्र सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या प्रशिक्षणाचा असंघटित असलेल्या लॉजिस्टिक्स उद्योगाला मोठ्या प्रमाणात फायदा करून देण्यात आलेला आहे.