नवी दिल्ली - सीमेलगत असणाऱ्या देशांमधील व्यक्ती अथवा कंपन्यांना भारतात आता थेट गुंतवणूक करता येणार नाही. देशात गुंतवणुकीसाठी सीमेलगतच्या देशातील लोकांना व कंपन्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे डीपीपीआयटीने म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटात असताना चीनने देशातील कंपन्यांची मालकी घेण्यावर अटकाव करण्यासाठी डीपीपीआयटीने निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सध्या, केवळ बांगलादेश आणि पाकिस्तानमधील कंपन्यांनाच देशात गुंतवणुकीसाठी परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, डीपीपीआयटीच्या (अंतर्गत व्यापार आणि उद्योग प्रोत्साहन विभाग) नव्या निर्णयानुसार चीनलाही देशात गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा-'कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करा'