नवी दिल्ली - जर तुम्ही आधार कार्ड हे पॅनबरोबर जोडले (लिंक) केले नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता 30 जून 2021 पर्यंत नागरिकांना आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येणार आहे. 31 मार्च 2021 ही आधार व पॅन कार्ड लिंक करण्याची आज शेवटची तारीख होती.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आजतागायत दहाहून अधिक वेळा आधार व पॅनकार्ड जोडण्याची मुदत वाढवली आहे. आजही मुदतवाढ दिल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विटरद्वारे दिली आहे.
2018 मधील सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड योजना संवैधानिकदृष्ट्या वैध असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे पॅन कार्ड हे आधारला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा-सरत्या आर्थिक वर्षात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकूण 90.82 लाख कोटी रुपयांची वाढ