मुंबई- मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील फिल्मसिटीचे अनेक जणांना आकर्षण असते. या फिल्मसिटीने गेल्या पाच वर्षात प्रवेश शुल्कातून ७.५५ कोटी रुपये कमविले आहेत. तर ९.२९ लाख रुपये फिल्मसिटीत विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांकडून वसूल केले आहेत. ही फिल्मसिटी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळाकडून (एमएफएससीडीसीएल) चालविण्यतात येते.
राज्य सरकारने १९७७ मध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीच काम पूर्ण केले. यामध्ये चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी ४२ ठिकाणे आहेत. एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१९ दरम्यान २.९३ लाख लाख लोकांनी फिल्मसिटीला भेट दिली. ही फिल्मसिटी गोरेगावमधील आरे कॉलनीमधील ५२० एकरामध्ये आहे.
असे आहे प्रवेश शुल्क-
भारतीयांसाठी ६०० रुपये तर विदेशी नागरिकांसाठी ३ हजार रुपये प्रवेश शुल्क आहे. विद्यार्थ्यांना केवळ ३५० रुपये शुल्क भरावे लागते.