महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

18 ते 45 वयोगटासाठी कोरोना लसीकरण खुले करा- फिक्कीची सरकारकडे मागणी - फिक्की संघटना

फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. त्यांनी पत्रात म्हटले की, सध्या आपण रोज 11 लाख चाचण्या घेत आहोत.

vaccination
कोरोना लसीकरण

By

Published : Apr 3, 2021, 5:41 PM IST

नवी दिल्ली- देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत फिक्की या उद्योग संघटनेने सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. देशामध्ये चाचणी केंद्रे सुरू करावीत आणि 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण खुले करावे, अशी फिक्कीने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. त्यासाठी उद्योगाकडून सहकार्य केले जाईल, असेही संघटनेने म्हटले आहे.

फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत. त्यांनी पत्रात म्हटले की, सध्या आपण रोज 11 लाख चाचण्या घेत आहोत. जानेवारीत आपण 15 लाखांच्या चाचणीच्या पातळीपर्यंत जानेवारीत पोहोचलो होतो. देशातील 2,440 लॅबमधून चाचण्या करण्याची अधिक क्षमता आहे. त्यामध्ये 1,200 चाचण्या या खासगी क्षेत्रात आहेत. कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी खासगी क्षेत्रातील क्षमतेचा राज्यांनी वापर करावा, असा सल्ला उदय शंकर यांनी दिला.

हेही वाचा-आईस्क्रीमची वाढली मागणी ; किमतीत बदल होणार नसल्याचे अमुलचे संकेत

कोरोना लशीचा तुटवडा नाही-

देशात कोरोना लशीचा तुटवडा नाही. त्यामुळे खासगी क्षेत्राला सहभागी करण्याची मोठी संधी आहे. 18 ते 45 वयोगटात कोरोना लस उपलब्ध करावी, जेणेकरून देशातील कोरोनाच संसर्ग कमी होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा-रोज दहा मिनिटे व्हिडिओ गेम खेळल्याने ईस्पोर्ट कौशल्यामध्ये होते वाढ

महाराष्ट्र लसीकरणात देशात प्रथम-

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते. असे असले तरी राज्यात लसीकरणाचा वेगदेखील तितक्याच वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 62 लाख 9 हजार 337 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात आजपर्यंत 6 कोटी 51 लाख 17 हजार 896 लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात अवघ्या 6 लाख 98 हजार 899 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details