महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भीम अॅप आता चालणार विदेशातही;  सिंगापूर व भारतामध्ये सांमजस्य करार - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

तत्काळ आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेले भीम अॅप आता सिंगापूरमध्येही वापरता येणार आहे. दक्षिण आशियायी देशांशी आर्थिक व्यवहार करताना सुलभता यावी याकरिता भारत आणि सिंगापूरने हे पाऊल उचलले आहे.

संपादित -

By

Published : Nov 11, 2019, 8:16 PM IST

Updated : Nov 12, 2019, 9:55 AM IST

सिंगापूर- तत्काळ आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेले भीम अॅप आता सिंगापूरमध्येही वापरता येणार आहे. दक्षिण आशियायी देशांशी आर्थिक व्यवहार करताना सुलभता यावी याकरिता भारत आणि सिंगापूरने हे पाऊल उचलले आहे. याद्वारे आर्थिक व्यवहार करताना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर होण्यास चालना मिळणार आहे.

याबाबत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (फिक्की) आणि सिंगापूर फिनटेक असोशिएशनमध्ये सांमजस्य करार झाला आहे. त्यामुळे सिंगापूरमध्येही भीम अॅपचा वापर करता येणे शक्य होणार आहे.

एका कार्यक्रमात भीम-यूपीआय क्यूआरचे लाँचिंग करण्यात आले. त्यामुळे सिंगापूरमध्येही भीम-यूपीआयने आधारित आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. पहिल्यांदाच भीम अॅप आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरता येणार आहे. हा प्रकल्प नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि नेटवर्क फॉर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर्स (एनईटीएस) सिंगापूरने तयार केला आहे.

भीम अॅप ही क्यूआर यंत्रणेवर आधारित पैशांचे व्यवहार करण्यासाठीची व्यवस्था आहे. यामध्ये भीम अॅप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला एनटीएसच्या टर्निमलमधून सिंगापूरमध्ये अर्थव्यवहार करणे शक्य होणार असल्याचे भारतीय राजदूत कार्यालयाने म्हटले आहे. भारत व सिंगापूरमध्ये आर्थिक व्यवहार करताना तंत्रज्ञान वापराबाबत याआधीच विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. सिंगापूर येथील अनेक कंपन्या भारतामध्ये असल्याचे सिंगापूरमधील भारतीय राजदूत जावेद अशरफ यांनी सांगितले.

ट्रेड प्रमोशन कॉन्सिल ऑफ इंडीया (टीपीसीआय) या भारताच्या संस्थेने सिंगापूरमधील पतधोरण यंत्रणेसोबत (एमएस) करार केला आहे. फिक्की आणि एसएफएमधील करारामधून फिनटेक कंपन्यांना माहितीची आदान-प्रदान करण्यात येणार आहे. तसेच संयुक्तपणे विविध उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे. त्यातून दोन्ही देशामधील वित्तीय तंत्रज्ञानाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

Last Updated : Nov 12, 2019, 9:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details