महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खूशखबर! फास्टॅगचे शुल्क १५ दिवस माफ;२९ फेब्रुवारी शेवटची मुदत - Ministry of Road Transport and Highways

डिजीटल संकलन वाढविण्याकरता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन चालकांना फास्टॅगसाठी १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२० पर्यंत १०० रुपये द्यावे लागणार नाहीत.

FASTag
फास्टॅग

By

Published : Feb 13, 2020, 1:39 PM IST

नवी दिल्ली - टोलनाक्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक टोलचे संकलन वाढविण्याकरता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टटॅगची फी २९ फेब्रुवारीपर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील ५२७ राष्ट्रीय महामार्गावर केंद्र सरकारने फास्टटॅगवर आधारीत टोल संकलन सुरुवात करण्यात आले आहे.

हेही वाचा-महागाईचा भडका: विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर १४४ रुपयांनी महाग

फास्टॅगची मोफत सुविधा घेण्याकरता वाहन चालक कोणत्याही अधिकृत केंद्रावर जावू शकतात. ही सुविधा सर्व टोल नाका, प्रादेशिक वाहतूक कार्यालय, किमान सुविधा केंद्र, पेट्रोल पंप आदी ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

वाहन चालक मायफास्टटॅग अपवरून जवळील अधिकृत केंद्र शोधू शकतात. तसेच www.ihmcl.com या वेबसाईट अथवा १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा-केजरीवाल यांच्या 'अर्थपूर्ण' कामगिरीचा विजयासाठी 'असा' झाला फायदा

फास्टॅग वॉलेटसाठी लागणारी कमीत कमी रक्कम आणि सुरक्षा अनामत रक्कम यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यापूर्वी एनएचएआयने फास्टॅगची सुविधा २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत देण्याची घोषणा केली होती.

गेल्या महिन्यात फास्टॅगची टोलनाक्यांवर सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील टोलनाक्यांवर रोज जमा होणारी रक्कम ही ६८ कोटी रुपयांवरून ८७ कोटी रुपये झाली आहे. संपूर्ण व्यवस्थेत फास्टॅगची अंमलबजावणी झाली तर रोज १०० कोटी रुपये टोल मिळेल, अशी एनएचएआयची अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details