गंगापूर(औरंगाबाद) -जर इच्छाशक्ती व नियोजन असेल तर शेतकरी यशस्वीपणे शेतीमधून मिळवू शकतो. हे गंगाखेड तालुक्यात बगडी येथील बोडखे शेतकरी कुटुंबाने दाखवून दिले आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रातून चार लाखापर्यंतचे उत्पादन मिळविले आहे.
गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ऊस, गहू कांदा पीक घेणासाठी अधिकचा खर्च येत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. बगडी येथील एकत्रित कुटूंबामध्ये राहणारे शेतकरी कैलास बोडखे, सीताराम बोडखे, श्रीकांत बोडखे या तीन भावंडाकडे वडिलोपार्जित 35 एकर शेती आहे. त्यात ते ऊस, कांदा, गहू पिकांचे उत्पादन घेत आहेत. मात्र, हे पीक घेण्यासाठी खर्चही भरपुर करावा लागत असल्याने पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून त्यांनी दोन एकर केळीची सेंद्रिय पद्धतीने लागवड करायचा निर्णय घेतला. दोन एकर क्षेत्रात अजीत G9 या वाणाची दोन हजार दोनशे रोपांची लागवड केली. या केळी लागवडीतून त्यांना चार लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले.
हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात
सेंद्रिय पध्दतीने केले केळीचे व्यवस्थापन-
बोडखे शेतकरी कुटुंबाने केळीची सेंद्रीय पद्धतीने उत्पादन व त्यानंतर स्वत: विक्री करून भरघोस उत्पन्न मिळविले. दहा ते पंधरा देशी गाई असल्याने केळी लागवडीनंतर शेतात कुजलेले शेणखत वापरले. देशी गाईच्या गोमुत्रापासुन व शेणापासून जीवामृत, घनजीवामृत या सेंद्रिय खतांचा वापर करून केळी पिकांसाठी खतांचे व्यवस्थापन केले.
हेही वाचा-खूषखबर! कोरोनाविरोधातील लस खासगी रुग्णालयात मिळणार फक्त २५० रुपयांत!