हैदराबाद- देशात कोरोनाचे संक्रमण आणि त्या पार्श्वभूमीवर केलेले लॉकडाऊन हे कुक्कुटपालन व्यवसायासाठी धोक्याचे ठरले आहे. देशातील कुक्कुटपालन व्यवसायाला फेब्रुवारी महिन्यापासून सुमारे २२ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे अखील भारतीय कुक्कुटपालन संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
निवेदनात अखील भारतीय कुक्कुटपालन संघटनेने आर्थिक मदत, कर्जाची पुनर्रचना, अनुदान याबाबत मागणी केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चिकन आणि अंडे खालल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरली होती. या अफवेमुळे चिकन व्यवसायाला मोठे नुकसान झाले आहे, असे अखील भारतीय कुक्कुटपालन संघटनेचे अध्यक्ष सुरेश चितुरी यांनी सांगितले.