हैदराबाद -केंद्र सरकारने बनावट नोटांचे चलनातून प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलूनही त्याचा परिणाम झालेला नाही. मागील वर्षात २०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण हे १५१ टक्क्यांनी वाढल्याचे आरबीआयने वार्षिक अहवाल २०१९-२० मध्ये म्हटले आहे, तर बनावट नोटांमध्ये सर्वाधिक १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण राहिले आहे.
नोटाबंदीनंतरही २०० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात १५१ टक्क्यांची वाढ - RBI annual report on Counterfeit notes
मागील वर्षात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण हे वाढून ३७.५ टक्के झाले आहे. तर २ हजार रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घसरून २२.१ टक्के झाले आहे.
![नोटाबंदीनंतरही २०० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात १५१ टक्क्यांची वाढ संग्रहित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8574479-188-8574479-1598511348541.jpg)
आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, मागील वर्षात नव्या २०० रुपयांच्या (महात्मा गांधी नवीन श्रेणी) बनावट नोटा आढळल्याचे प्रमाण १५१ टक्क्यांनी वाढले आहे. तर मागील वर्षात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण हे वाढून ३७.५ टक्के झाले आहे. तर २ हजार रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घसरून २२.१ टक्के झाले आहे.
केंद्र सरकारने बनावट नोटांचे प्रमाण वाढल्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. त्यानंतर सरकारने २ हजार रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटा चलणात आणल्या आहेत. या नोटांची विशिष्ट डिझाईन असल्याने त्या बनावट तयार करून चलनात आणणे कठीण असेल, असा सरकारने दावा केला होता. हे डिझाईन सरकारने नव्याने चलनात आणलेल्या १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये आणि २०० रुपये यांच्या नोटांमध्ये वापरले आहे.
- मागील वर्षात ११.६ लाख बनावट नोटा चलनात आढळल्या आहेत. यापैकी आरबीआयने ४.६ टक्के बनावट नोटा शोधून काढल्या आहेत. तर ९५.४ टक्के नोटा इतर बँकांनी शोधून काढल्या आहेत.
- विशेष म्हणजे १० रुपयांच्या बनावट नोटांचे चलनात सर्वाधिक प्रमाण आढळले आहे. वर्षभरातच १० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण हे १४५ टक्क्यांनी वाढले आहे. तर चलनातील एकूण बनावट नोटांपैकी १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण हे २६ टक्के राहिले आहे.
- दुसरीकडे मागील वर्षात २० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घसरून ३७.७ टक्के तर १०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण घसरून २३.७ टक्के राहिले आहे.
- गेल्या दोन वर्षात २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई झाली नसल्याचेही आरबीआयने वार्षिक अहवालात नमूद केले आहे. गेल्या काही वर्षात २ हजार रुपयांचे चलनातील वितरण कमी झाले आहे.