सॅनफ्रान्सिस्को- समाज माध्यम कंपनी फेसबुकने न्यूज फीडमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलामुळे वापरकर्त्याला पोस्ट केलेला कंटेन्ट कुणी पाहायचा यावर नियंत्रण करणे शक्य आहे.
फेसबुकमधील न्यूज फीडवर वापरकर्त्याला ठेवता येणार नियंत्रण - latest tech news
न्यूज फीडमध्ये इतरांनी किती जणांनी कॉमेंट करावी, यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्यासाठी तुमच्या पोस्ट किती जणांनी पाहावी अथवा किंवा पेज टॅग केलेल्या लोकांनी पाहावी, याचे पर्याय असणार आहेत.
न्यूज फीडमध्ये इतरांनी किती जणांनी कॉमेंट करावी, यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्यासाठी तुमच्या पोस्ट किती जणांनी पाहावी अथवा किंवा पेज टॅग केलेल्या लोकांनी पाहावी, याचे पर्याय असणार आहेत. कंपनीने नुकतेच फेव्हरिट्स हे नवीन टूल लाँच केले होते. या टूलमुळे वापरकर्त्याला निवडक मित्र आणि पेजला पोस्ट प्राधान्याने दाखविणे शक्य होणार आहे.
जे फेव्हरिट्स सतत वापरतात, त्यांच्यासाठी फिल्टर बार हे फीडमध्ये देण्यात आले आहे. अँड्राईड अॅपच्या वापरकर्त्यांना न्यू फीडमध्ये स्कॉल केल्यानंतर फीड फिल्टर बार दिसतो. हीच सुविधा येत्या आठवड्यात आयओएस अॅपमध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहे. कॉमेंट करण्याची संख्या नियंत्रित केल्यानंतर सार्वजनिक पोस्टवरील अनावश्यक संवाद टाळू शकता, असे फेसबुकने म्हटले आहे. तुमच्या पोस्टवर किती जणांनी कंमेंट करावी किती कंटेन्ट दिसावा हे फीचरही फेसबुककडून देण्यात येणार आहे. व्हाय अॅम आय सीईंग धीस हे या फीचरचे नाव आहे.
हेही वाचा-मारुतीसह टोयोटाच्या वाहन विक्रीत मार्चमध्ये दुप्पटीने वाढ