सॅनफ्रान्सिस्को - काही वापरकर्ते उपहासात्मक मजकूर (कंटेन्ट) देत असतात. अशा स्थितीत खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविताना फेसबुकचा कमालीचा गोंधळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने उपहासात्मक (सटाईर) मजकुरावर थेट सटाईर असे लेबलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबुकवरील पेज कशासंदर्भात आहे, हे वापरकर्त्यांना लवकर समजण्यासाठी कंपनीने यापूर्वीच महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानंतर कंपनीने अमेरिकेतील वापरकर्त्यांसाठी काही प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-मुकेश अंबानी सेबीच्या दंडाविरोधात दाखल करणार अपील
जेव्हा वापरकर्ते न्यूज फीड पाहत असतात, तेव्हा त्यावर सार्वजनिक सरकारी किंवा फॅन पेज, सटाईर पेज दाखविण्यास सुरुवात केल्याचे फेसबुकने म्हटले आहे. त्यामुळे आपण काय पाहत आहोत, हे वापरकर्त्यांना अधिक चांगले समजू शकेल, असे कंपनीने म्हटले आहे. हे लेबलिंग का केले जात आहे, याबाबत कंपनीने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र, कुणालाही सहज कळू शकते की, फेसबुक हा निर्णय का घेत आहे!