नवी दिल्ली- फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांसाठी फेसबुकने मोठी भेट दिली आहे. तुम्हाला लोकप्रिय गाणी आणि व्हिडिओ बिनधास्त शेअर करता येणार आहेत. त्यासाठी फेसबुकने टी-सिरीज, झी म्युझिकसह यशराज फिल्मबरोबर करार केला आहे. त्यामुळे गाणे आणि व्हिडिओ शेअर केल्यास फेसबुककडून वापरकर्त्यावर होणारी कॉपीराईटची कारवाई टळणार आहे.
लोकप्रिय गाणी- व्हिडिओ फेसबुकसह इन्सटाग्रामवर बिनधास्त शेअर करता येणार
भारतातील लोकांना हजारो गाणी आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे फेसबुकवर त्यांना शेअर करणे अधिक अर्थपूर्ण आणि खास ठरणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
भारतातील लोकांना हजारो गाणी आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे फेसबुकवर त्यांना शेअर करणे अधिक अर्थपूर्ण आणि खास ठरणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. यापूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात येणाऱ्या गाण्यासह व्हिडिओवर कॉपीराईट प्रकरणी करण्यात येत होती. कारण संबंधित कंपन्यांकडे कॉपीराईटचे हक्क होते. भारतामधील संगीत उद्योगाबरोबर भागीदारी करून आम्ही उत्साही आहोत. आपले मित्र आणि कुटुंबासह व्यक्त होण्यासाठी भारतीयांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असल्याचे फेसबुक इंडियाचे संचालक मनीष चोप्रा यांनी सांगितले. यामध्ये गल्ली बॉयमधील अपना टाईम आयेगा, सिंबामधील आंख मारे, सैराटमधील झिंगाट गीत आदी लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. बॉलीवूडमधील गाणी जगभरातल्या कोपऱ्यात ऐकली जावीत, हा कॉपीराईट घेण्यामागे हेतू आहे. फेसबुक वापरकर्ते त्यांच्या भावना मेम्स, पोस्ट, मेसेज हे मसाला-तडका टाकून तयार करता येणार असल्याचे टी-सीरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांनी सांगितले.