नवी दिल्ली - फेसबुक इंडियाच्या प्रमुख अन्खी दास यांनी संसदीय समितीला व्हॉट्सअॅप हेरगिरीप्रकरणी अहवाल सादर केला. समाज माध्यमात एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन असल्याचे कंपनीने म्हटले अहवालात आहे.
स्थायी समितीच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सायबर सुरक्षातज्ज्ञांना बैठकीसाठी बोलाविले होते. नागरिकांची माहिती सुरक्षा व गोपनीयतेवर त्यांचे विचार जाणून घेतले. एन्ड टू एन्ड एनक्रिप्शनच्या नियमाचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचा दावा फेसबुक इंडियाच्या प्रमुख अन्खी दास दास यांनी केला.
दूरसंचार सचिव अंशू प्रकाश आणि गृह मंत्रालयाचे अधिकारीही समितीच्या बैठकीला हजर राहिले. समितीने साक्षीदार म्हणून भाजपचे माजी सचिव गोविंदाचार्य यांना नोटीस बजावली होती. गोविंदार्चाय हे वकिलासमवेत बैठकीला उपस्थित राहिले. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपचे प्रतिनिधी, दूरसंचार विभागाचे अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि दिल्लीचे मुख्य सचिव उपस्थित राहिले.