हैदराबाद- बिगर वैद्यकीय मास्कच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लोकर, कापूस व रेशीमपासून तयार करण्यात आलेले मास्क निर्यात करणे शक्य होणार आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सूचनेनुसार आयटीसीएचएस कोड आणि एचएस कोड असलेल्या सर्व मास्कच्या निर्यातीवर निर्बंध कायम राहणार आहेत. केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटामुळे एन-९५ सारख्या वैद्यकीय मास्कच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहे. यामागे कोरोनाच्या लढ्यात आवश्यक असलेल्या वैद्यकीय मास्कचा देशात तुटवडा पडू नये, हा उद्देश आहे.