नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ कृषी क्षेत्राचा आर्थिक विकासदर वाढला आहे. तर उत्पादन, बांधकाम व सेवा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासदराला फटका बसल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर हा २३. ९ टक्क्यांनी घसरल्याची आकडेवारी आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन (जीव्हीए) हे ३९.३ टक्क्यांनी एप्रिल ते जूनच्या तिमाहातीत चालू आर्थिक वर्षात घसरले आहे. तर मागील आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन हे ३ टक्क्यांनी वाढले होते.
- चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन हे ३.४ टक्क्यांनी वाढले आहे. तर गतवर्षी कृषी क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन हे ३ टक्क्यांनी वाढले होते.
- बांधकाम क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन हे ५०.३ टक्क्यांनी घसरले आहेत. तर मागील आर्थिक वर्षात बांधकाम क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन हे ५.२ टक्के होते.
- खाण उद्योगाचे उत्पादन हे २३. ३ टक्क्यांनी घसरले आहे. तर मागील आर्थिक वर्षात खाण उद्योगाचे उत्पादन हे ४.७ टक्क्यांनी वाढले होते.
- वीजनिर्मिती, गॅस, पाणी पुरवठा आणि सेवांच्या वृद्धीदरात ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर या क्षेत्रात मागील आर्थिक वर्षात ८.८ टक्क्यांची वृद्धी होती.
- व्यापार, हॉटेल, वाहतूक, संवाद आणि सेवांच्या वृद्धीदरात ४७ टक्के घसरण झाली आहे. मागील आर्थिक वर्षात या क्षेत्रांचा वृद्धीदर हा ३.५ टक्के होता.
- वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवांच्या वृद्धीदर ५.३ टक्के घसरण झाली आहे. तर मागील आर्थिक वर्षात या क्षेत्रांचा पहिल्या तिमाहीत ६ टक्के वृद्धीदर होता.
- लोक प्रशासन, संरक्षण आणि इतरांच्या वाढीतही १०.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. या क्षेत्रांनी गतवर्षी ७.७ टक्क्यांचा वृद्धीदर अनुभवला होता.
संबंधित बातमी वाचा-अर्थव्यवस्थेची गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठी घसरगुंडी; पहिल्या तिमाहीत २३.९ टक्क्यांची घसरण