नवी दिल्ली - नगरपरिषद व नगरपालिकांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या कर्मचाऱ्यांनाही ईसआयसीचा लाभ मिळू शकणार आहे.
देशभरातील अनेक नगरपालिकांमध्ये हंगामी अथवा करारानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, हे कर्मचारी सामाजिक सुरक्षेपासून वंचित होते. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८ ची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
हेही वाचा-कोरोना लशींसह औषधावरील जीएसटी दराबाबत १२ जूनला जीएसटी परिषदेची बैठक
ईएसआयसीने राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना देशभरातील १६० रुग्णालये आणि १,५०० डिस्पेन्सरीमधून आरोग्य सेवा घेता येणार आहेत. नगरपालिकांमधील आर्थिक दुर्बल असलेल्या मनुष्यबळाला सामाजिक सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा व कुटुंबांचा सामाजिक स्तर उंचाविण्यास मदत होणार आहे.
ईएसआयसी योजनेसाठी कोणते कामगार नोंदणी करू शकतात?
ज्यांचे मासिक उत्पन्न २१ हजारांहून कमी आहे, ते कामगार ईएसआयसीसाठी नोंदणी करू शकतात. दर महिन्याला वेतनातील रक्कम ईएसआयसीसाठी कपात होते. त्यामधून कामगाराला वैद्यकीय लाभ मिळतात.
हेही वाचा-एलपीजी ग्राहक विनाशुल्क बदलू शकतात वितरक, जाणून घ्या, प्रक्रिया