नवी दिल्ली -कर्मचारीभविष्य निर्वाह निधीबाबत महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओकडून भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदर ४ मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंडळाच्या विश्वस्तांची (सीबीटी) ४ मार्चला श्रीनगरमध्ये बैठक आहे. या बैठकीत पीएफबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
ईपीएफओकडून २०२०-२१ साठी पीएफचे व्याजदर जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले. ईपीएफओचे विश्वस्त के. ई. रघुनाथन म्हणाले की, सीबीटीची बैठक ४ मार्चला श्रीनगरमध्ये होणार असल्याची सूचना मिळाली आहे. या बैठकीची विषयपत्रिका लवकरच मिळणार आहे. बैठकीच्या सूचनेमध्ये व्याजदराबाबत चर्चा होणार असल्याचा उल्लेख नसल्याचे रघुनाथन यांनी सांगितले.
हेही वाचा-अॅमेझॉनवर विक्रेत्यांना मराठीतही करता येणार व्यवसायाची नोंदणी
गतवर्षी मार्चमध्ये आर्थिक वर्ष २०१९-२० साठी पीएफचे व्याजदर ८.५ टक्के जाहीर करण्यात आले होते. हे व्याजदर सात वर्षातील सर्वात कमी आहे. तर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये पीएफसाठी व्याजदर हा ८.६५ टक्के होता. आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये यापूर्वी पीएफवरील व्याजदर हा ८.५ टक्के होता.
हेही वाचा-महागाईत आणखी भडका: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयाने वाढ
असे आहेत यापूर्वीचे पीएफवरील व्याजदर-