न्यूयॉर्क– इलेक्ट्रिक मल्टीकुकरचा कोरोनाच्या महामारीत नवा फायदा समोर आला आहे. कोरोनाच्या लढ्यात संरक्षणासाठी महत्त्वाचा असलेल्या एन 95 मास्क हे मल्टीकुकरने निर्जंतुकीकरण करणे शक्य असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. मल्टीकुकरमधून मास्क निर्जंतुकीकरण केल्याने सुरक्षित आणि वापरण्यास योग्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
इलेक्ट्रिक कुकरच्या वापरातून एन 95 मास्क सॅनिटाईज करण्याबाबतचे संशोधन हे इन्व्हायरमेन्टल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. इलेक्ट्रिक कुकरमध्ये एन 95 मास्कला दोन्ही बाजुंनी 50 मिनिटे कोरडी उष्णता दिल्यास तो पुन्हा वापरणे शक्य आहे. याबातची माहिती देताना अमेरिकेतील इसियन्स विद्यापीठाचे संशोधक विशाल वर्मा म्हणाले, की एन 95 मास्क हे निर्जंतुकीकरणाचे अनेक पर्याय आहेत. मात्र, बहुतांश पद्धतींमधून त्यांच्या फिल्टरेशन नष्ट होते. त्यामुळे एन 95 मधून सुरक्षित असा श्वास घेणे शक्य होत नाही.