यवतमाळ - पडीक जमीन म्हटले तर शेतीचे कोणतेही पीक घेणे जवळपास शक्य असते. मात्र, ' इच्छा तेथे मार्ग ' या उक्तीचा प्रत्यय आणत दारव्हा येथील तरुणाने पडीक जमिनीवर लघु उद्योग प्रकल्प साकारला आहे. आकाश चिरडे असे सुशिक्षित बेरोजगारांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतातील पडीक जमिनीवर फ्लाय अॅश वीट उद्योगाची उभारणी केली आहे.
दारव्हा येथील राजुरा रोडवरील शेतातील पडीक जमिनीचा योग्य उपयोग करण्याची योजना आकाश चिरडे यांनी आखली. त्यांचे एमए, एमकॉम, बी एड. पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. मात्र नोकरीच्या मागे न लागता एखादा उद्योग उभारायचा हा विचार आकाश यांच्या मनात घर करून बसला होता. त्यांनी जिल्ह्यातील विविध लघु उद्योगाची माहिती संकलित केली. दारव्हा परिसरात काय करता येईल, या दिशेने अभ्यास केला.
आकाश यांना ध्येपूर्तीसाठी अखेर मार्ग सापडला. त्यांनी फ्लाय अॅश वीट निर्मितीचा लघु उद्योग उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे विशेष प्रशिक्षण घेतले. सरकारच्या पी. एम. ई. जी. पी. योजनेअंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, दारव्हा शाखेच्या सहकार्याने भांडवल उभारले.
हेही वाचा-गॅस सिलिंडरच्या किमती पुढील महिन्यात कमी होण्याची शक्यता - धर्मेंद्र प्रधान